पुणे : मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारदार तरुणी वडगाव शेरी परिसरात वास्तव्याला आहे. जुलै २०२२ रोजी तरुणीचा एकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० गाड्या
तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. मोटार घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आली. तरुणीला धमकाविण्यात आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रेवले तपास करत आहे.
First published on: 09-03-2024 at 13:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a girl married with the gay boy without knowing crime against mother in law and her husband pune print news rbk 25 css