पुणे : दत्तनगर भागात कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीवर चाकूने वार केले. त्यानंतर दोघींचा उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेनंतर आरोपी पती अजय तळेवाले स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. मयत पत्नी श्वेता तळेवाले (वय ४०) आणि मयत मुलगी शिरोली तळेवाले (वय १६) या दोघींचा खून आरोपी अजय तळेवाले याने केला आहे.

हेही वाचा : पुणे : मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर ‘शेअर’ रिक्षाची सुविधा, महामेट्रोबरोबरच्या बैठकीत निर्णय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय तळेवाले याचे पत्नी श्वेता तळेवाले हिच्याशी काही महिन्यांपासून सतत पैशांवरून वाद होत होते. तसाच वाद शुक्रवारी रात्री देखील पती-पत्नीमध्ये झाला. त्यामुळे आरोपी अजय याने पत्नी श्वेता झोपेत असताना तिच्या हाताची नस कापली आणि चाकूने वार केले. तिथेच असलेली मुलगी शिरोली हिच्यावर देखील त्याने चाकूने वार केल्यावर दोघींचे उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपी अजय तळेवाले स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला असून अधिक तपास सुरु असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.