पुणे शहर पोलीस विभागात परिवहन विभागामध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या वैभव दिलीप शिंदे या कर्मचार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव दिलीप शिंदे लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनी येथे पत्नी कांचन आणि चार वर्षाचा मुलगा यांच्या सोबत राहत होते. आज पहाटेच्या सुमारास वैभव यांनी घराच्या टेरेसवर असलेल्या चिंचेच्या झाडाला टॉवेलच्या साह्याने गळफास घेतला. ही घटना वैभव शिंदे यांची पत्नी कांचन यांच्या लक्षात आल्यावर वैभव यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरनी वैभव यांना मृत घोषित केले.

हेही वाचा… पार्थ पवारांचा पराभव करणारे खासदार श्रीरंग बारणे म्हणतात, “अजित पवार सरकारमध्ये आल्याने ताकद वाढली!”

वैभव शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहुन ठेवली होती. ‘ कांचन मला माफ कर,भाऊ, मम्मी मला माफ करा, विजय माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, कांचन सोबत लग्न कर, सॉरी… ‘ असा मजकूर त्यामध्ये लिहिला आहे. या आत्महत्या प्रकरणी कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.