पुणे : पिरंगुट घाटात खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. बसमधील त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. पिरंगुटहून पुण्याकडे निघालेल्या खासगी प्रवासी बसने रविवारी रात्री पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगर प्रादेशिक विभागाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: भाजपचा ‘कर दशहतवाद’, डॉ. शशी थरूर यांचे टीकास्त्र

पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. बसचालक आणि सात प्रवासी त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. उन्हाळ्यात वाहनांचे इंजिन गरम झाल्यानंतर शाॅर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a private bus caught fire at pirangut ghat pune print news rbk 25 css