सोसायटीचे देखभाल शुल्क (मेंन्टनन्स) न भरल्याने रहिवाशाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : काकाकडून दोन अल्पवयीन पुतणींवर अत्याचार, काकासह मित्राविरोधात गुन्हा

हेही वाचा – ‘टिळक कुटुंबातील उमेदवार देणार नाही, असं कोण म्हणाले?’ कसबा पोटनिवडणुकीवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान

दीपक साहेबराव फडतरे (वय ४०, रा. श्रीकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे जखमी झालेल्या रहिवाशाचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक तुषार शहा (रा. खराडी) यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फडतरे यांनी या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फडतरे यांनी सोसायटीचा मेंन्टनन्स भरला नव्हता. या कारणावरून शहा यांनी फडतरे यांना शिवीगाळ केली. शहा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या दोघांनी फडतरे यांना गजाने मारहाण केली. मारहाणीत फडतरे यांचा हात फ्रॅक्चर झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत.