पुणे : गादी कारखान्यातील यंत्रात अडकून (फोम मिक्सर मशीन) कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात घडली. अपघातात एक कामगार जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी यंत्रचालकाविरुद्ध (ऑपरेटर) गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद अर्षद अन्सारी (वय २७, रा. मनुकेरी, पलामु, झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. दुर्घटनेत कामगार कैलास भारत कौल (वय २१, रा. सध्या रा. वडकीनाला सासवड रस्ता, मूळ रा. रोहनीया, देवगाव, मध्यप्रदेश) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आहेत. कौल याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गादी कारखान्यातील यंत्रचालक अमित बल्लु धुर्वे (वय २५, सध्या रा. वडकीनाला, सासवड रस्ता, मूळ रा. बम्हनी, छिंदवाडा, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : पिंपरी : चिंचवडची भाजपची उमेदवारी आमदार अश्विनी जगताप की शंकर जगताप यांना? पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘अनुभव’…!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडकीनाला येथे स्नुज हब कम्फर्ट अँड स्लीप रेडीफाईन्ड या कंपनीत गादी, उशी तयार केली जाते. रविवारी ( १ सप्टेंबर) सर्व कामगार कंपनीत आले होते. त्यावेळी कौल आणि अन्सारी फोम मिक्सर यंत्रातील साठलेला कापूस, तसेच कचरा काढण्याचे काम करत होते. यंत्राची साफसफाई करत असताना यंत्रचालक धुर्वे याने यंत्रात काेणी उतरले का नाही, याची खातरजमा केली नाही. त्याने अचानक यंत्र सुरू केले. यंत्रात अन्सारी अडकल्याने गंभीर जखमी झाला. कौल याचा पाय यंत्रात अडकल्याने तो ओरडला. कंपनीतील कामगारांनी यंत्रात अडकलेल्या कौलला बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या अन्सारी याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a worker died in mattress factory machine worker injured pune print news rbk 25 css