पुणे: शहरातील कल्याणीनगर भागातील एका पबमधून शनिवारी मध्यरात्री पार्टी करुन तरुण आणि तरुणी दुचाकीवरून घरी जात होते. मात्र या तरुण आणि तरुणीच्या दुचाकीला बेभान कार चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. कार चालक आरोपी हा १७ वर्षीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : राज्यात आठ दिवस पावसाचा मुक्काम; मोसमी वाऱ्यांबाबतही गुड न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील एका हॉटेलमधून अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे जण शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पार्टी करून दुचाकीवरून घरी निघाले होते. हॉटेलपासून काही अंतर पुढे आल्यावर लॅन्डमार्क सोसायटी जवळ ग्रे कलरच्या दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कारने (एम.एच. १४ सी क्यु ३६२२) बजाज पल्सरवरून जात असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दोघे जण रस्त्याच्या बाजूला पडले. या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.