पुणे : मैत्रीमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवून घेत तरुणीला शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ११ मार्च आणि २२ मे रोजी सेनापती बापट रस्त्यावरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये आणि दीप बंगला चौकात घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक बाळकृष्ण काकडे (वय ३०), प्रज्योत बाळकृष्ण काकडे (३२, रा. बालाजी अपार्टमेंट, नवी सांगवी) आणि आश्विन पवार (२९, रा. वसई) यांच्यावर विनयभंगासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सेनापती बापट रस्त्यावरील एका शासकीय कार्यालयात काम करतात. आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात वाद झाले होते. मैत्रीत झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतीक याने फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये बोलवून घेतले. त्या गेल्या असता आरोपी प्रज्योत त्या ठिकाणी होता. त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या दुसऱ्या कार्यालयाकडे निघाल्या. आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन दीप बंगला चौकात अडवून शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतीक याने बोलवून घेतले. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ केली. तर प्रज्योत आणि आश्विन यांनी फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक शामल पाटील पुढील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a young girl beaten up by 3 friends case of molestation registered against three pune print news vvk 10 css