पुणे : पत्नी नांदायला येत नसल्याच्या रागातून एका तरूणाने पोलीस चौकीतच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना चंदननगर भागात घडली. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवनाथ कचरू लोखंडे (वय २६ रा. डोमखेल रस्ता, वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मुकेश पानपाटील (वय ३१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवनाथ आणि त्याच्या पत्नीत वाद झाले होते. ती माहेरी निघून आली होती. सासू-सासऱ्यांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याने नवनाथ चिडला होता. तो सासूरवाडीत गेला. त्यावेळी त्याने पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तिने चंदननगर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील महात्मा फुले पोलीस चौकीत असल्याचे सांगितले.

हेही वाचा : VIDEO : “मंगळ ग्रहाकडे जाणारा देश पुन्हा मंगळसूत्राकडे जातोय”, रवींद्र धंगेकरांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र; म्हणाले, “आजपर्यंत…”

त्यानंतर नवनाथ तेथे गेला. पोलीस चौकीत जाताना त्याने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत भरले. पोलीस चौकीत गेल्यानंतर त्याने सासू-सासऱ्यांविरुद्ध तक्रार केली. पत्नी नांदायला येत नसल्याने चिडलेल्या नवनाथने अंगावर बाटलीतील पेट्रोल ओतले. पोलीस चैाकीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्याला रोखले. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a young man attempted suicide at police station due to his wife not coming home to live with him pune print news rbk 25 css