पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी अपघात झाला. बोगद्यात दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक मोटार अचानक थांबली. त्यापाठोपाठ चार मोटारी आदळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्यात शुक्रवारी दुपारी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली मोटार अचानक थांबली. त्यापाठोपाठ पाठीमागून येणाऱ्या मोटारी आदळल्या. अपघातात मोटारींचे नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुण्यातील डॉक्टरसह सहा दहशतवाद्यांविरुद्ध एनआयएकडून आरोपपत्र; पुणे, मुंबईसह देशभरात बाँम्बस्फोट घडविण्याचा कट

अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त मोटारी बाजूला काढण्यात आल्यानंतर अर्धा तासात वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. अपघातात कोणी जखमी झाले नाही.