पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खुन करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय २८, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण (वय २०, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू पाटोळे आणि आयुष सोनवणे (दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नामदेव जाधव यांना काळे फासल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
badlapur encounter case all four accused policemen move bombay high court
बदलापूर चकमक प्रकरण : ठपका ठेवलेल्या चारही पोलिसांची उच्च न्यायालयात धाव, दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाची प्रत देण्याची, म्हणणे ऐकण्याची मागणी
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
IT girl murder, rape case, Mumbai,
विश्लेषण : मुंबईत आयटी तरुणी हत्या, बलात्कार प्रकरणात तपासातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष… नेमके प्रकरण काय होते?
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!

रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक आणि आरोपी सोनू, आयुष गप्पा मारत थांबले होते. आरोपींनी दारू प्याली होती. त्या वेळी आरोपी आणि प्रतीक यांच्यात वाद झाला. आरोपी सोनू आणि आयुष यांनी प्रतिकच्या डोक्यात फरशी मारली. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. आरोपींनी प्रतीकचा खून वैमनस्यातून केल्याचा संशय आहे.

Story img Loader