पुणे : महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत झोपलेल्या तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आल्याची घटना रेंजहिल्स भागात घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत आशिषकुमार नरेंद्रकुमार दास (वय २४, रा. सिंबायोसिस बॉईज हॉस्टेल, रेंजहिल्स) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रेंजहिल्स परिसरातील सिंबायोसिस बॉईज हॉस्टेलमध्ये राहायला आहे. शनिवारी (२३ मार्च) तो वसतिगृहातील खोलीत रात्री साडेआठच्या सुमारास झोपला होता. त्यावेळी एकजण वसतिगृहातील खोलीत शिरला. त्याने प्लास्टिकच्या मगमध्ये ॲसिडसदृश रसायन भरले. झोपेत असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर मगमध्ये असलेले रसायन फेकून तो पसार झाला.

हेही वाचा…उन्हाच्या तडाख्यामुळे पारा ४१ अंशांवर, किती दिवस राहणार उष्णतेच्या झळा?

झोपेत असलेल्या आशिषकुमारच्या अंगावर रसायन ओतल्याने दाह झाला. त्याने आरडाओरडा केला. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वसतिगृहातील खोलीचा दरवाज्याला बाहेरून कडी लावण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तरुणाने याबाबत नुकतीच तक्रार दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रूईकर तपास करत आहेत. पोलिसांनी वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्याने खोडसाळपणे आशिषकुमारच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन ओतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune acid like chemical thrown on sleeping college student boys hostel near range hills police investigate pune print news rbk 25 psg