पुणे: छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर राज्यातील अनेक संघटना आक्रमक होत,राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराबाहेर आंदोलन करण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.

त्याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.त्या प्रश्नावर ते म्हणाले की, अशी बांडगूळ खूप आहेत. त्यामुळे आम्ही अशा बांडगुळांकडे कधी लक्ष देत नसल्याचे सांगत राहुल सोलापूरकर यांच्यावर त्यांनी टीका केली.

Story img Loader