पुणे : वायुदलाच्या ९१व्या स्थापना दिनानिमित्त रेडिओ कंट्रोलद्वारे उडणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आला होता. उडणारा गरुड, उडता मासा, उडती तबकडी, दोन पंखी बायप्लून, बॅनरसह हवाई पुष्पवृष्टी करणारे सेस्ना विमान ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये होती. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी एरोमॉडेलिंगचा आनंद घेतला. विमानप्रेमी सदानंद काळे, एरोमॉडेलर अथर्व काळे यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली.
हेही वाचा : पुणे : रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड चोरली, सेनापती बापट रस्त्यावरील घटना
या कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, शिक्षण विभागाच्या योजना विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर, एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, ब्रिगेडियर जय भट्टी या वेळी उपस्थित होते.