शिरूर : शिरूर लोकसभेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. अमोल कोल्हे हे तीन वर्षांपूर्वी राजीनामा देणार होते असे देखील त्यांनी म्हटले. आगामी लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना अजित पवार आव्हान देणार असून शिरूर लोकसभेसाठी तगडा उमेदवार देणार आहेत. तो निवडून आणणारच असा ठाम विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केलाय. या वक्तव्यानंतर भोसरीमधील माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे सर्वांची नजर गेली आहे. २०१९ च्या लोकसभेसाठी विलास लांडे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, ऐनवेळी आताचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विलास लांडे अॅक्टिव्ह झाले असून अजित पवारांनी उमेदवारी दिल्यास इच्छुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in