पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू असतानाच पुण्यातील मुंबई बेंगळूर मार्गावर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे बाह्यमार्गावरील बाह्यवळण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेची माहिती मिळतात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली.
हेही वाचा… “मराठा-कुणबी एकच आहेत, सरकारला आरक्षण…”, शाहू महाराज छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीनंतर काय म्हणाले?
हेही वाचा…. “आमदार-खासदारांनो मुंबई सोडू नका, गट तयार करा, मुख्यमंत्र्यांचे पाय पकडून…”, मनोज जरांगेंचं आवाहन
मराठा आरक्षणासाठी बाई वळण मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी नवले पूल परिसरात टायर जाळल्यामुळे मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्यास सूचना दिल्या. त्यानंतर या परिसरातील वाहतूक सुरळीत झाली.