पुणे : राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. त्यानंतर लगेचच पुण्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील एका स्मारकाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. खडकी कटळ मंडळाच्या परिसरात मुळा नदीच्या काठावर होळकर छत्री ही ऐतिहासिक वास्तू आहे. होळकर छत्री आणि शिवमंदिर ही ऐतिहासिक वास्तू इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटीज ट्रस्ट यांची ही खासगी मालमत्ता आहे. होळकर छत्री येथे मराठा साम्राज्यातील होळकर घराण्यातील दोन स्मारके आणि महादेवाचे मंदिर आहे. तटबंदीयुक्त असलेली ही छत्री, शिवमंदिराचे शिखर १८व्या शतकातील मराठा शैलीतील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे : शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरणात अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

खडकी येथील होळकर छत्री आणि महादेव मंदिराला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठीची कार्यपद्धती पूर्ण झाली आहे. त्यामुळे होळकर छत्रीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिसूचनेचा इंग्रजी आणि मराठीतील अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला आहे. ही अधिसूचना राजपत्र भाग ४मध्ये प्रसिद्ध करावी. तसेच पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभागाच्या संचालकांनी अधिसूचनेची प्रत या स्मारकाजवळ ठळक ठिकाणी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. होळकर छत्री ही प्रसिद्ध होळकर पुलाजवळ स्थित आहे. छत्रीलगत असलेल्या नदीच्या काळातवर दगडी घाट बांधलेला आहे.

Story img Loader