पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारच्या सुमारास चार जणांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपींना काही तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र आगामी काळात शहरात टोळी युद्ध होऊ नये या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील जवळपास २६७ हून अधिक गुंडाच्या टोळी प्रमुखांना चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ हे देखील उपस्थित होते. तर या गुंड निलेश घायवळ याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मुंबईत फोटो काढला होता आणि मंत्रालय परिसरात रिल्स देखील तयार केली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होते. यावरून विरोधकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकच टीका करण्यास सुरुवात केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा