पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या नियामक मंडळीची बैठक आज होत आहे. ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. तर या नियामक मंडळावर अजित पवार, दिलीप वळसे पाटील,जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळी या नियामक मंडळावर आहेत.त्या पार्श्वभूमीवर आज होणार्या बैठकीला अजित पवार हे ८.१० वाजता बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यावेळी उपस्थित नागरिकांची निवेदन स्वीकारली आहे.
त्याच दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले. त्यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा देखील झाली. या दोघांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली. हे मात्र समजू शकले नाही. तर या सर्व घडामोडी दरम्यान शरद पवार हे बैठकीच्या ठिकाणी ९ वाजून ४० मिनिटांनी आले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि दिलीप देशमुख यांनी शरद पवार यांचे स्वागत केले.
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक होत आहे. त्यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच वेळ चर्चा देखील झाली. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली. हे मात्र समजू शकले नाही. (व्हिडिओ क्रेडिट – सागर कासार/लोकसत्ता टीम) pic.twitter.com/c9t6x0lLw2
— LoksattaLive (@LoksattaLive) March 22, 2025
त्यानंतर शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाहत म्हणाले,लवकर आलात का ? त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, हो साहेब म्हणाले, त्यानंतर शरद पवार हे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत काही अंतर पुढे चालत गेल्यावर, अजित पवार हे उपाध्यक्षच्या केबिनमध्ये बसले होते.
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज होत आहे. अजित पवार हे केबिनमध्ये चर्चा करत होते. त्यावेळी शरद पवार यांनी केबिनमध्ये कोण आहे हे काही सेकंद पाहत पुढे जाणे पसंत केले. (व्हिडिओ क्रेडिट – लोकसत्ता टीम/सागर कासार) pic.twitter.com/pRXT4W9d3X
— LoksattaLive (@LoksattaLive) March 22, 2025
त्या केबिनच्या जवळ पोहोचताच,दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या केबिनचा दरवाजा उघडला.त्यावर अजित पवार हे आतमध्ये काही व्यक्तीसोबत चर्चा करित होते. तर त्या केबिनमध्ये कोण आहे. हे शरद पवार यांनी काही सेकंद पाहत पुढे जाणे पसंत केले.