पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत दाखल झाला आहे. त्या मोर्चाबाबत राज्य सरकारकडून कशा प्रकारे दखल घेतली जात आहे? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले असून भांगे म्हणून एक अधिकारी आहेत. त्यांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठविण्यात आलं असून त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं अ सांगितलं.
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, त्याबाबतीत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. मी हे सुरुवातीला सांगितलं आहे. पुन्हा विचारून उगाच खोदुन खोदुन विचारून त्यामधून काही तरी अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा : ‘ओळखपत्रावरील ठिपका’ वादात, शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर टीका
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जुन्नर येथील एका कार्यक्रमादरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. त्याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “तू उगाच काही थापा मारू नकोस, त्यांनी (मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी) काळे झेंडे दाखविले नाही. त्यावेळी तिथे उबाठाचा अध्यक्ष (माऊली) होता. काहीही बेमालूम बोलत असतात. तसंच माझा कार्यक्रम संपत आल्यावर, त्या ठिकाणी केवळ ८ लोक होते. पण ठीक आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार असतो.”