पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगर येथील मोदी बागेतील निवासस्थानी खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला शिवनेरीपासून सुरुवात होत आहे. “या मोर्चात आम्ही ६ मुद्दे घेऊन यात्रा काढत आहोत. अजित पवार यांनी काल केलेल्या विधानावर मी माझी भूमिका कालच मांडली आहे. तसेच आम्ही ६ महिन्यांपूर्वी हडपसर येथील विकासकामांची पाहणी केली होती”, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

“मी सामान्य कुटुंबातील असून त्यांना (अजित पवारांना) काउंटर करणे मला योग्य वाटत नाही. माझ्या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा वाटा होता. त्यांनी भूमिका का बदलली, मला माहित नाही. मी आहे त्याच ठिकाणी आहे. खासगीतील चर्चा सार्वजनिक करणं योग्य नाही. दादांचा एवढा दरारा आहे तर त्यांनी केंद्र सरकारला बोलावं आणि कांदा निर्यात बंदी उठवावी”, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”

हेही वाचा : येरवड्यात भररस्त्यात एकाने पेटवून घेतले; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तातील पोलीस मदतीसाठी धावले

“तत्वांबरोबर राहणं योग्य आहे. मी माझ्या पक्षासोबत आहे. मी कुठे गेलो आहे? आमदारांनी कोण कोणत्या कारणांमुळे भूमिका बदलली, हे येणाऱ्या भविष्यात समजेल. माझा ना कारखाना आहे, ना कंपन्या आहेत, ना माझ्यावर चौकशी आहे. दादांनी काल एका चित्रपटाचं उल्लेख केला. त्या चित्रपटातील संवादाबाबत बोलायचे झाल्यास, शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी द्यावी असे दिल्लीपतीच्या मनात होते. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती, मात्र तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही आणि तत्वांशी महाराजांनी तडजोड केली नाही”, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

Story img Loader