पुणे : हडपसर भागात कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विरोधी पथकातील सहायक निरीक्षक, तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. बेकायदा पथारी लावणाऱ्या महिलेने सहायक निरीक्षकाला धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्नेहल विकी हुबळेकर (वय ३०, रा. बंटर शाळेजवळ, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक पंकज पालाकुडतेवार (वय ३०) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेशोत्सवात हडपसर गाडीतळ परिसरात बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली.

हेही वाचा : शून्य ‘पर्सेटाइल’ असेल, तर परीक्षाच का घ्यायची? ‘नीट पीजी’बाबत केंद्राच्या निर्णयावर वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी

फूल विक्री करणाऱ्या हुबळेकर हिला पथारी उचलण्यास सांगण्यात आले. तेव्हा तिने पथकातील कर्मचारी राहुल चोर आणि सुभाष राखपसरे यांना शिवीगाळ केली, तसेच सहायक निरीक्षक पालाकुडतेवार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune assistant inspector of anti encroachment squad slapped by a woman while removing encroachment in hadapsar area pune print news rbk 25 css