पुणे : आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वसपदी अ‍ॅड. राजेंद्र बाबुराव उमाप यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात झालेल्या मासिक सभेत सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांची प्रमुख विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. कमिटीची मासिक सभा आज पुण्यात पार पडली.

हेही वाचा : दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत राज्य मंडळाचा मोठा निर्णय…

सभेत दिनांक १७ जानेवारी २०२४ पासून अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांची प्रमुख विश्वस्तपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. राजेंद्र उमाप हे महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट या देवस्थानचे विद्यमान विश्वस्त आहेत. तसेच, जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेडच्या व्यवस्थापन कमिटीवर चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी २०१३ मध्ये पुणे बार असोसिएशनचे अध्यक्षपदी भूषविले आहे.

Story img Loader