पुणे : कोल्हापूर – पुणे यात्रा विशेष गाडीला आग लागल्याचा संदेश…प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ यामुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला. राष्ट्रीय आपत्ती निवारण पक्षक (एनडीआरएफ ) आणि वैद्यकीय मदत रेल्वेही तातडीने पोहोचली. बचाव आणि मदत कार्य प्रभावीपणे कसे पार पाडता येईल आणि अपघातात प्रवाशांना कशी मदत करता येईल याविषयीचे हे मॉक ड्रीलचे असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

पुणे-सातारा रेल्वे मार्गाच्या आळंदी स्थानकावरील कोल्हापूर-पुणे पॅसेंजर स्पेशल ट्रेनच्या स्लीपर एस-१ डब्याला आग लागल्याची माहिती आळंदी स्टेशन मास्तर यांनी नियंत्रण कक्ष पुणे यांना दूरध्वनीद्वारे दिली. अपघाताचा संदेश मिळाल्यानंतर विभागीय नियंत्रण कक्षाकडून सर्व विभागांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली.

demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

हेही वाचा : पुणे : करोना काळानंतरचा मोठा बदल… ‘याच्या’ मागणीमध्ये ३५ टक्क्यांपर्यंत वाढ!

आगीची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि विभागीय सुरक्षा अधिकारी देवेंद्र कुमार, वैद्यकीय पथक आणि रेल्वे सुरक्षा दलासह तत्काळ अपघातस्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघाताची माहिती एनडीआरएफ, एमसीओ, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागालाही देण्यात आली. ते सर्वजण अर्ध्या तासात आपापल्या पथकांसह घटनास्थळी पोहोचले. जेव्हा सर्व अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना हे ‘मॉक ड्रिल’ असल्याचे समजले तेव्हा त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यानंतर मॉक ड्रीलमध्ये डब्यात अडकलेल्या प्रवाशांना विविध उपकरणांद्वारे बाहेर काढणे, त्यांना रुग्णालयात नेणे, प्राथमिक उपचार करणे आदींचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सर्व विभागांची तत्परता पाहून मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी धनंजय नाईक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा : कुणी शहर कार्यालयासाठी जागा देता का जागा?… पुण्यातील सत्ताधारी भाजपवर ही वेळ का आली?

यावेळी मुख्यालयातील उपमुख्य सुरक्षा अधिकारी व्ही.बी.पाटील, एनडीआरएफचे उपकमांडंट प्रवीण, विभागीय संरक्षा अधिकारी पुणे देवेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता शादाब जमाल, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.रामदास भिसे, रेल्वे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सजीव, अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निती आहुजा आणि त्यांचे पथक व विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. एकूण २१० कर्मचारी, अधिकारी, पोलीस, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

Story img Loader