पुणे : धनकवडी भागात भरधाव मोटारीने एकापाठोपाठ सात वाहनांना धडक दिली. अपघातात तिघेजण जखमी झाले असून अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. धनकवडीतील आंबेगाव पठार भागातील अल्पवयीन मुलगा मित्रासह भरधाव वेगाने मोटारीतून निघाला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. अपघातानंतर अल्पवयीन मुलगा घाबरला. भरधाव वेगाने मोटारीतून तो पसार झाला. नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. अल्पवयीन मुलाचे नियंत्रण सुटले. मोटारीने मोटारी, रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. नागरिकांनी पाठलाग करुन अल्पवयीन मुलाला पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पकडले. अपघातात तिघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Cyrus Poonawalla : सीरम इंडियाचे सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टी पूर्ण

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीतील अल्पवयीन मुलांन ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जखमी, तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. अपघातानंतर मोठ्या संख्येने नागरिक सहकारनगर पोलीस ठाण्यात जमले. पोलिसांनी पालकांना बोलावून घेतले आहे. पालकांच्या नकळत मुलांनी मोटार नेल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at dhankawadi a speeding car collided with seven vehicles 3 injured pune print news rbk 25 css