पुणे : हातउसने घेतलेले पैसे परत न केल्याने शिवीगाळ करून त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी भागात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आजिनाथ सर्जेराव लोखंडे (वय ४२, रा. तळजाई पठार, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. लोखंडे यांना धमकावून आत्महत्येस प्रवृ्त केल्याप्रकरणी रामदास काशिनाथ त्र्यंबके (रा. बाभळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. जांभुळवाडी, आंबेगाव, कात्रज), मयूर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारिका आजिनाथ लोखंडे (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पुण्यात रविवारी ४०० ठिकाणी होणार ई-कचरा गोळा; संगीतकार डाॅ. सलील कुलकर्णी यांनी केले पुणेकरांना ‘हे’ आवाहन

लोखंडे यांचा भंगार माल खरेदी व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी आरोपींकडून हातऊसने पैसे घेतले होते. व्यवसायातील मंदीमुळे लोखंडेने पैसे परत करण्यास उशीर केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपींनी दिलेल्या धमकीमुळे लोखंडे तणावाखाली होते. आरोपींच्या धमकीमुळे लोखंडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लोखंडे यांची पत्नी सारिका यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at dhankawadi businessman commits suicide due to insolvency pune print news rbk 25 css
Show comments