पुणे : भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सासवड रस्त्यावर वडकी गाव परिसरात घडली. भरधाव दुचाकी चालून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पूनम गोपाळ मुर्मू (वय २०, रा. भैरवपूर, जि.ढुमका, झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार आशिष उत्तमसिंग चव्हाण (वय १९, रा. धामणगाव, ता. माेताळा, जि. बुलढाणा) जखमी झाला आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Pune Crime News: गांजा ओढणाऱ्या सराइतांना हटकल्याने दुचाकींची जाळपोळ

दुचाकीस्वार आशिष आणि पूनम शुक्रवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी सासवडहून पुण्याकडे निघाले होते. दिवेघाटातून भरधाव वेगाने निघालेल्या दुचाकीस्वार आशिषचे वडकी गाव परिसरात नियंत्रण सुटले. हाॅटेल माऊंटन व्ह्यूसमोर दुचाकी घसरली. दुचाकीवरील सहप्रवासी पूनमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीस्वार आशिषला किरकोळ दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या पूनमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.