पुणे: आयटी हब असलेल्या हिंजवडीत एका फ्लॅटमध्ये चालत असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत फ्लॅटमध्ये दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. आयटी हब असल्याने हिंजवडीत उच्चभ्रू लोक राहतात किंबहुना वावरतात. याचा फायदा घेऊन माऊली क्लासिक इमातीच्या पहिल्या मजल्यावर मारूंजी येथे वेश्या व्यवसाय केला जात होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक विभागाने केली आहे.