पुणे : नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. बबलू इस्लाम अन्सारी (वय १९, रा. अश्विनी अपार्टमेंटच्यामागे, चव्हाण चाळ, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर (वय २४, रा. अश्विनी अपार्टमेंटजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : साखरपट्ट्यात महाविकास आघाडी सरस; महायुती काठावर उत्तीर्ण, भाजपाला जोरदार फटका

pune police arrested gang who preparing for robbery in hotel in khadakwasla area
दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड- पिस्तूल, काडतुसे, कोयते जप्त
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
truck out of hole pune, paver block collapse pune,
पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना
Mumbai, Worker died, Worker hit by car,
मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना
in pune thieves stolen sandalwood from army officers bungalow
पुणे : शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ- लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ

आरोपी बबलू कामधंदे करत नाही. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. अश्विनी अपार्टमेंटसमोर असलेल्या मोकळ्या जागेत परिसरातील रहिवासी वाहने लावतात. मंगळवारी (४ जून) मध्यरात्री बबलूने अश्विनी अपार्टमेंटसमोर लावलेल्या दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळाल्या. पाच दुचाकींना झळ पोहोचली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तपासात आरोपी बबलू अन्सारीने दुचाकी पेटवून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तपास करत आहेत.