पुणे : देशाच्या संरक्षणासाठी समर्थ अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए ) ७५ वर्षांच्या इतिहासात दीक्षांत संचलनात (मार्चिंग) महिलांच्या बटालियनने गुरुवारी प्रथमच पदसंचलन केले. ही ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद करत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महिलांच्या संचलनातील सहभागाची प्रशंसा केली. पहाटेचे शीतल वातावरण आणि हवेहवेसे वाटणारे ऊन अशा प्रसन्न वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४५ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन गुरुवारी दिमाखात पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. राज्यपाल रमेश बैस, सरसेनाध्यक्ष (चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल मनोज डोग्रा या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : राज्यात शनिवारपासून हुडहुडी…जाणून घ्या कोणत्या ठिकाणी पारा उतरणार

संचलनाला संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दीक्षांत संचलनात महिलांचा सहभाग असणे निश्चितच कौतुकास पात्र आहे. एनडीएमधून एकूण ३५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली असून, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या दीक्षांत संचलनानंतर त्यांनी ‘अंतिम पग’ पादाक्रांत केला. संचलनात सहभागी झालेले १२ छात्र हे मित्र देशांतील होते.

हेही वाचा : प्रवाशांना नेमकी विषबाधा कशामुळे? रेल्वेकडून कारणांचा शोध सुरु

चीफ ऑफ स्टाफ बॅनर : हेमंत कुमार
राष्ट्रपती सुवर्णपदक : प्रथम सिंग
राष्ट्रपती रौप्य पदक : जतीन कुमार
राष्ट्रपती कांस्यपदक हर्षवर्धन : शैलेश भोसले

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at national defence academy first time women s battalion parade pune print news vvk 10 css
Show comments