पुणे : विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी, वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार अशा घटनांमुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून, विद्यापीठाच्या आवारातील प्रवेशावर बंधने आणण्यात आली आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारांवर बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, तर सर्व वसतीगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल प्रवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांमध्ये बुधवारी हाणामारी झाली, त्यानंतर गुरुवारी विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार अभाविपने केली. या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आंदोलन केल्यानंतर त्यांची स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाचीची झाली. या घटनांमुळे गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठ चर्चेत आले आहे, तसेच विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा : सोन्या मारुती चौकातील सराफी पेढीतून एक कोटी दागिन्यांची चोरी

हेही वाचा : पुणे विद्यापीठात पुन्हा राजकीय राडा, भाजपा कार्यकर्ते, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची

या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच काही व्यक्ती हा मजकूर समाजमाध्यमाद्वारे प्रसारित करून, प्रसिद्धी देऊन या कृत्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या सर्व संबंधितांविरुद्ध चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विद्यापीठ या विकृत मानसिकतेचा जाहीर निषेध करीत आहे. विद्यापीठाचे पावित्र्य जपणे समाजाच्या सर्व घटकांची नैतिक जबाबदारी आहे. सदर प्रकटनाद्वारे जाहीर करण्यात येत आहे की विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला. तसेच विद्यापीठात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची सुरक्षा वाढवण्यात येत आहे. सर्व प्रवेशद्वारांवर आवश्यक बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकशी नोंदणी करून प्रवेश देण्यात येईल, तसेच सर्व वसतीगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.