पुणे : टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तीन कोटी ५९ लाख ९९ हजार रुपये त्यांनी भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे पैसे १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान कमावले असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. श्रीराम विष्णु शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सहाच आरोपींविरुद्ध आरोपपत्र; अन्य आरोपींविरुद्ध का नाही?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांच्या विरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. १९८६ ते २१ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया भ्रष्टाचारातून कामावल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यांच्या घरातून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार रोख रक्कम, १४५ तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत ही ७२ लाख आहे. असे एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या लोकसेवक सेवेच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचं निष्पन्न झाले आहे. म्हणून याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास लाचलुचपतच्या पोलीस अधीक्षक माधुरी भोसले या करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at the residence of tukaram supe illegal wealth of rupees 3 crores found in tet scam kjp 91 css