पुणे : विश्रांतवाडी भागातून एक कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पुण्यात मेफेड्रोनच्या विक्रीस पाठविणाऱ्या गुजरातमधील एका बड्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. तस्कराने पुण्यासह देशातील वेगवेगळ्या भागात मेफेड्रोनची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मोहम्मद अस्लम मोहम्मद इस्माईल मर्चंट (रा. जंबुसर, जि.भरूच, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे. विश्रांतवाडीतील लोहगाव भागात एका सदनिकेत मेफेड्रोनचा साठा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून एक कोटी रुपयांचे ४७१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित बेंडे, निमीष आबनावे यांना अटक करण्यात आली. आरोपींनी कुरिअरमार्फत मेफेड्रोन घरपोहोच दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कुरिअर कंपनीतील कर्मचारी विश्वनाथ कोनापुरे (सध्या रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. सोलापूर) याला अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : CM Eknath Shinde : “…तर दीड हजारांचे तीन हजार होतील”, लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान

पुण्यातील मेफेड्रोन विक्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निमीष आबनावे असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आबनावेची चौकशी केली. तेव्हा गुजरातमधील मेफेड्रोन तस्कर मोहम्मद मर्चंट याने अमली पदार्थ विक्रीस दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक गुजरात भरुच येथे गेले. सापळा लावून मर्चंट याला ताब्यात घेण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी एकचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नितीन नाईक, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अविनाश लाहोटे, नितेश जाधव, दयानंद तेलंगे, अविनाश कोंडे यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at vishrantwadi area mephedrone drugs of rupees one crore seized from gujarat s smuggler pune print news rbk 25 css