पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस, तसेच ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गालगत नागरीकरण वाढत आहे. बाह्यवळण मार्गाच्या परिसरात हिंजवडी आयटी पार्क आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी बाह्यवळण मार्गावर वाहनांची गर्दी असते. अवजड वाहनांकडून बाह्यवळण मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या भागात दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक विस्कळीत होती. वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना मार्ग काढावा लागतो. भरधाव अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शेरे, सुनील गवळी या वेळी उपस्थित होते.

Maharashtra rain red alert
Maharashtra Rain News: रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
PM Narendra Modi Italy Visit
Unified Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!
passengers had to be pulled out of water along with their bags and belongings at pune railway station
पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
girl Student molested in PMP bus marathi news
पीएमपीतून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीची छेड; विरोध करणाऱ्या महिला वाहकाला आणि ज्येष्ठ नागरिकाला छेड काढणाऱ्यांकडून मारहाण
pune fire brigade saves two persons
पुणे: अग्निशमन दलाकडून मुठा नदीपात्रात अडकलेल्या दोघांची सुटका
Goa, citizens Goa angry, Impact of tourism,
गोवेकर का चिडले आहेत? पर्यटनाचा कहर मुळावर उठला आहे का?
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

हेही वाचा : पुणे: अग्निशमन दलाकडून मुठा नदीपात्रात अडकलेल्या दोघांची सुटका

हिंजवडी आयटी पार्कमध्ये विविध कंपन्या आहेत. कार्यालय भरणे, तसेच सुटण्याच्या वेळी वाहतूककोंडी होत असल्याचे लक्षात आले आहे. अवजड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गावर वाहतूक बदल करणे गरजेचे आहे. वडगाव पूल आणि वारजे येथील मुठा नदीवरील पूल अरुंद आहे. पूल अरुंद असल्याने या भागात वाहतूककोंडी होते. गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना निर्बंध घातल्यास कोंडी होणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

आठ महिन्यांत १५ जणांचा मृत्यू

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर गेल्या वर्षी २१ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत बाह्यवळण मार्गावर झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत १५ जण मृत्युमुखी पडले आहेत. गंभीर अपघात, वाहतूककोंडीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांनी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हरकती आणि सूचना आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा : Maharashtra Rain News: रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

अवजड वाहने थांबविण्यासाठी जागा निश्चित

बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना सकाळी आणि सायंकाळी निर्बंध घालण्यात येणार आहे. अवजड वाहने थांबविण्यासाठी पोलिसांनी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. खेड शिवापूर परिसरात १७ एकर जागा, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग परिसरात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग एकेकाळी शहराबाहेरील मार्ग होता. बाह्यवळण मार्गालगत नागरीकरणाचा वेग वाढत आहे. हिंजवडी आयटी पार्क या भागात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर पूर्वीपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.

मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त