पिंपरी : महापालिका किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील मोकळ्या जागेत भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा सुरू करावी. त्याद्वारे परिसरातील उद्योग व रोजगार क्षेत्राला चालना द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १९९७ मध्ये चिखली, तळवडे, रुपीनगर, मोशी, चऱ्होली, दिघी, कुदळवाडी, बोऱ्हाडेवाडी गावांचा समावेश करण्यात आला. मात्र, २०१७ नंतर समाविष्ट गावांतील विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही सुरू झाली. रस्त्यांचे जाळे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, आंतराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र, स्केटिंग ग्राउंड, डीअर सफारी पार्क, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुल असे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.

हेही वाचा : बिबवेवाडीतील गुंडाविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अमरावती कारागृहात रवानगी

शहर हिताच्या दृष्टीने महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा शहरात व्हावी. आयआयएम संस्थेकडून शाखा विस्तारासाठी जागेची पाहणी करण्यात येत आहे. त्यासाठी हवेली तहसील प्रशासन आणि पुणे विभागीय प्रशासनाकडून शासकीय जागा आणि गायरान जमिनीच्या उपलब्धतेची चाचपणी सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्टा, मुंबई आणि पुणे शहरांशी असलेले जवळचे अंतर याचा विचार करून शहरात आयआयएम शाखा सुरू करणे सोईचे होईल, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune bjp mla mahesh landge demands iim branch at pimpri chinchwad to deputy cm devendra fadnavis pune print news ggy 03 css