पुणे : लोकसभा निवडणुकीत झालेली चूक लक्षात आली आहे. ती चूक विधानसभेला होणार नाही, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला २०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकळे यांनी येथे व्यक्त केला.
हेही वाचा : पुणे: महाअधिवेशनात नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीची चर्चा
भाजपचे पुण्यात प्रदेश महाअधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ६० जागा अल्पमतांनी गमवाव्या लागल्याचे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की मंत्रालयावर भगवा फडकावयाचा आहे. प्रत्येक बूथवर दहा मतांची गरज आहे. अधिवेशनातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने दहा ते पंचवीस मतदार वाढवा. नव्याने मतदार नोंदणी करा. मला काय मिळेल, याचा विचार न करता जागा वाटपाचा निर्णय महायुतीत होईल. राज्यातील १४ कोटी जनतेला देण्यासाठी काम करा. माझा विश्वास आणि श्रद्धा तुमच्यावर आहे. तुम्ही हे कराल आणि महायुती २०० चा आकडा पार करेल. ही घमेंड नाही तर विश्वास आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.