पुणे : विमाननगर भागातील फिनिक्स मार्केट सिटी माॅलमध्ये बाॅम्बस्फोट घडवून देण्याची धमकी देणाऱ्या ईमेल पाठविण्यात आल्याने घबराट उडाली. याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी धमकीचा ईमेल पाठविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आदित्य राजेश शितोळे (वय ३०, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शितोळ फिनिक्स माॅलमध्ये व्यवस्थापक आहेत. शनिवारी दुपारी शितोळे यांनी माॅलमधील वरिष्ठ व्यवस्थापक संदीप सिंग यांना आलेल्या ईमेलची पाहणी केली. तेव्हा फिनिक्स माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल माॅल प्रशासनाला पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले. हिडनस बोन नावाच्या एकाने मेल पाठविण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर माॅल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांची कोणत्या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती?

बाँम्ब शाेधक नाशक पथकाने (बीडीडीएस) माॅलची तपासणी केली. तेव्हा माॅलमध्ये बाॅम्बसदृश्य वस्तू आढळून आली नाही. ‘मी आयुष्याला कंटाळलो आहे. माॅलमधील कोणी वाचू शकणार नाहीत. पोगो आणि नोरो मला त्रास देत आहेत,’ असे ईमेलमध्ये म्हटले होते. पाेलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून धमकीचा इमेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक जी. बी. होळकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune bomb threat phoenix mall on ahmednagar road pune print news rbk 25 css