पुणे : भांडारकर रस्त्यावरील एका बंगल्यात घरफोडी करुन पसार झालेल्या चोरट्याला डेक्कन पोलिसांनी अटक केली. गणेश प्रकाश आव्हाड (वय २०, रा. शासकीय रुग्णालयासमोर, घनसांगवी, जालना) असे अटक करण्यात् आलेल्याचे नाव आहे. भांडारकर रस्त्यावर एका व्यावसायिकाचा बंगला आहे. व्यावसायिक आणि कुटुंबीय विवाह समारंभानिमित्त बाहेरगावी गेले होते. १४ डिसेंबर रोजी आव्हाड बंगल्यात शिरला. बंगला बंद असल्याचे त्याच्या लक्षात आले. प्रसाधनगृहाच्या खिडकीतून तो आत शिरला. कपाटातील दागिने चोरून आव्हाड पसार झाला. याप्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर डेक्कन पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासात आव्हाडने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. आव्हाडने जालन्यात पसार झाला. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने त्याला जालन्यातून ताब्यात घेतले.

हेही वाचा : पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू, वानवडीतील घटना; चालक ताब्यात

आव्हाडने त्याची आई आणि मावशीच्या मदतीने घरफोडीचा गु्न्हा केल्याची माहिती तपासात मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, ,दत्तात्रय शिंदे, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर, गभाले, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader