पिंपरी : नामांकित ‘ब्रॅण्ड’चे बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी वाकड येथील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण नरेश शर्मा (वय ३८, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र सिंग (वय ३७, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : चिंचवड स्थानक येथील उड्डाणपूल लवकरच जमीनदोस्त; वाचा नवीन पूल कधी उभारणार
शर्मा याचे कस्पटे वस्ती वाकड येथे कपड्यांचे दुकान आहे. त्याने दुकानामध्ये नामांकित कंपन्यांंचे स्टिकर असलेले कपडे विक्रीसाठी ठेवले होते. कंपनीला बनावट कपड्यांंची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कंपनीकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी याबाबत कारवाई करत दोन लाख ६३ हजार २३० रुपये किमतीचे बनावट कपडे जप्त केले आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.