पुणे : शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौदा वर्षीय पीडित मुलगी एका शाळेत आहे. याप्रकरणी एका १६ वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीनाने मुलीचा आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण विवाह करु’, असे सांगून त्याने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा : छगन भुजबळ यांना अडीच वर्ष उपमुख्यमंत्री करा – ओबीसी नेते लक्ष्मण हाके

अल्पवयीनाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीन मुलींवर अत्यचार केल्याच्या किमान एक ते दोन घटना शहरात दररोज घडतात. अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.

Story img Loader