पुणे : सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत मुलाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक नागराज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेचा नऊ वर्षांचा मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी सुरक्षारक्षक नागराजने मुलाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. अश्लील कृत्य केल्याने मुलगा घाबरला. त्याने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपचे काम न करण्यावर ठाम तर भाजपने दिला ‘हा’ इशारा

मध्यंतरी लष्कर भागातील एका शाळकरी मुलावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका शाळकरी मुलाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा भागातील एका शाळकरी मुलावर सोसायटीच्या आवारात अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणात साडेतीनशेहून जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर, उपनगरातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे दररोज किमान एक ते दोन गुन्हे दाखल होत आहेत. शाळेत योग्य आणि अयाेग्य स्पर्शाबाबत समुपदेशन करण्यात येते. समुपदेशनामुळे बहुतांश प्रकरणात अल्पवयीनांवरील अत्याचारांना वाचा फुटली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune case registered against security guard for sexually harassment of a school boy pune print news rbk 25 css