पुणे : अकासा एअर कंपनीच्या अकरा विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे ट्विट करून धमकावल्या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात ट्विटर हॅन्डल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ’अ‍ॅट लुकासनतुली २२७१’ या ट्विटर हॅन्डल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारथी सर्वानंद पांडे (वय ३४, रा. दत्तकृपा सोसायटी, लोहगाव) यांनी विमानळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार अकासा एअरलाईन्सच्या गोवा ते पुणे, दिल्ली ते पुणे आणि पुणे ते कोलकाता प्रवासादरम्यान २२ ऑक्टोबर रोजी घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : कुख्यात लिमन ऊर्फ मामा टोळीतील दोघे सराईत अटकेत, एक पिस्तूल, तीन काडतुसे जप्त

u

दाखल गुन्ह्यानुसार लुकासातुली या ट्विटर हॅन्डलवरून अकासा एअरलाईन्स या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर संदेश पाठविण्यात आला. त्यामध्ये ‘दहशतवादी लुकास आणि तुलीप यांनी तुमच्या अकरा फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवला’ असल्याचा खळबळजनक संदेश होता. त्यानंतर विमानतळ प्रशासन तसेच कंपनीच्या वतीने सर्वत्र तपासणी केली. दरम्यान, हा खोडासाळपणे कोणी तरी अफवा पसरविण्यासाठी केल्याचे समोर आले. दरम्यान ज्या ट्विटर हॅन्डलवरून हा संदेश पाठविण्यात आला त्या विरोधात अफवा पसरवून भीतीदायक वातावरण निर्माण करून विमानातळावरील प्रवाशांच्या आणि कंपनीच्या कामगारांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.