पुणे : सिग्नलला चौकात थांबलेल्या रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी अडीच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. या प्रकरणी दोन तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ महिलेने याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला माॅडेल काॅलनीत राहायला आहेत. तक्रारदार महिला आणि नातेवाईक महिला रिक्षातून सेनापती बापट रस्त्याने निघाल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “काही जण शिळ्या कढीला ऊत आणत असून…”, टोल मुद्द्यावरुन अंधारेंचा मनसेला टोला

सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात रिक्षा सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दोन तृतीयपंथीय रिक्षाजवळ आले. त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने त्यांना दहा रुपये दिले. त्यानंतर दोघांनी महिलेकडे एक रुपया मागितला. महिलेने पिशवी उघडली. तेव्हा चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील अडीच हजार रुपयांची रोकड हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. तृतीयपंथीय पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune cash stolen by transgenders from woman travelling in auto rickshaw senapati bapat road pune print news rbk 25 css