पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ नातूबाग मैदान येथे प्रचार सभा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सभेत उपस्थितांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, रुपाली पाटील ठोंबरे, किरण साळी, हेमंत रासने, स्वरदा बापट, श्रीनाथ भिमाले, शैलेश टिळक, ॲड. मंदार खरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : पुण्याला आता नवीन पुण्याची गरज…नितीन गडकरी म्हणाले, “विमानतळावर स्वारगेटसारखी गर्दी…”

उपस्थितांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की नितीन गडकरी यांनी देशात रस्ते, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. त्यांना असलेली विकास कामांसंदर्भातील आवाका थक्क करणारा आहे. जगात त्या त्या काळात जो कोणी प्रमुख होता, कुठे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, कुठे पंतप्रधान म्हणतात… अशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा त्यांचा काळ संपताना अशा लोकप्रियतेला गेले, की आता ओबामाच होणार… पण अचानक ओबामा न होता ट्रम्प झाले. ट्रम्प लोकप्रियतेच्या शिखरावर गेले असताना प्रश्न होता की ट्रम्पशिवाय आहे कोण? अचानक ट्रम्प गेले आणि बायडेन आले… पण नरेंद्र मोदी २०१४मध्ये पंतप्रधान झाले. पाच वर्षांनंतर साधारणपणे नकारार्थी भाव निर्माण होतो. पण ते २०१४ पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. २०१४मध्ये मते होती १८ कोटी, जागा मिळाल्या २८२ आणि २०१९मध्ये मते पडली २३ कोटी आणि जागा मिळाल्या ३०३… आता आपण सगळे अस्वस्थ आहोत, की ते चारशेपार करणार आहे. ३० कोटी मते मिळतील. असं बाकीच्या देशांमध्ये घडलेले नाही. त्यामुळे ते घडवणारे नरेंद्र मोदी चारशेपार करतील तेव्हा आपण आश्वस्त होऊ की जगामध्ये हे खंबीर सरकार आहे….

Story img Loader