पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक परिसरात मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. शनिवारपासून मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या खांबाचे काम सुरु करण्यात येणार असून, औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचे आणि मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पिंपरी :महापालिका ठेकेदारावर मेहरबान; मोशी रुग्णालयाच्या वाढीव दराच्या निविदेला प्रशासनाची मान्यता

औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांनी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत चतुःशृंगी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या रस्त्याने विद्यापीठात प्रवेश करावा आणि मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडावे. तसेच पीएमपी, छोट्या बसचालकांनी डाव्या बाजूच्या मार्गिकेचा वापर करावा, तसेच तीन चाकी आणि चारचाकी वाहनचालकांनी उजव्या बाजूच्या मर्गिकेचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.