पुणे : बदलते निसर्गचक्र, जीवनशैलीतील बदल आणि ध्रूमपान यामुळे श्वसनविकाराचा धोका वाढला आहे. पुण्यातील ३० ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे श्वसनविकारांचा प्रतिबंध करण्यासाठी लस घेण्याची आवश्यकता आहे, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात मागील काही काळापासून हवा प्रदूषण वाढले आहे. त्यातच निसर्गचक्र बदलल्यामुळे हिवाळ्यातही पाऊस पडण्याचे प्रकार घडत आहे. या गोष्टींमुळे श्वासनलिकेत सूज येणे, छातीत कफ होणे, फुफ्फुस संसर्ग या प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. पाश्चात्त्य देशांमध्ये श्वसनविकार प्रतिबंधक लस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. तिथे याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर आहे. भारतात मात्र अद्यापही श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये लस घेण्याचे प्रमाण एक टक्क्यांहूनही कमी असल्याचे निरीक्षण श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी यांनी नोंदविले.

हेही वाचा : आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा भररस्त्यात पिस्तूल काढून राडा

पाच वर्षांखालील मुले, ज्येष्ठ नागरिकांनी न्यूमोनिया आणि श्वसन विकार घातक ठरतात. लहान मुलांमध्ये आता हे लसीकरण सुरू आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांमध्ये अद्याप ही लस घेण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनविकाराची गंभीर लक्षणे दिसून येतात. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस घेतल्यास पुढील धोका टाळता येईल, असे संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. देवाशिष देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा : द्रुतगती महामार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे

श्वसनविकाराचा वाढता धोका

जगात २०२० ते २०५० या कालावधीत चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा श्वसनविकारामुळे सर्वाधिक आर्थिक बोजा पडणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरणार आहे, असा अंदाज लॅन्सेटमधील संशोधनात व्यक्त करण्यात आला होता. जगभरात २०१९ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३३ लाख मृत्यू श्वसनविकारामुळे झाले होते. त्यात चीनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले होते तर त्याखालोखाल भारत आणि अमेरिकेचा क्रमांक होता. जगभरात श्वसनविकारामुळे होणारे मृत्यू २००९ ते २०१९ या कालावधीत १४.१ टक्क्यांनी वाढले आहेत, असेही संशोधनातून समोर आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune changing lifestyle and pollution increase the risk of respiratory disease to youths pune print news stj 05 css