पुणे : श्रावण महिन्यात मटण, मासळी, चिकनच्या मागणीत घट झाली आहे. मटण, मासळीला फारशी मागणी नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बाजारात मासळीची आवक कमी प्रमाणावर होत आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीतील मासळी २ ते ३ टन, नदीतील मासळी ५०० ते ६०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची एकूण मिळून १४ ते १५ टन आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे: फळांची आवक कमी; डाळिंब, लिंबू महागले

श्रावणात चिकनला फारशी मागणी नसल्याने चिकनच्या दरात प्रतिकिलोमागे १० रुपयांनी घट झाली. गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे दहा रुपयांनी वाढ झाली, अशी माहिती चिकनचे विक्रेते रुपेश परदेशी यांनी दिली. मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती मटण विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.