पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवरातून शुक्रवारी (२६ एप्रिल) मध्यरात्री सात महिन्यांचे बालक श्रावण अजय तेलंग याचे अपहरण करण्यात आले. भुसावळहून पुण्यात नातेवाईकांना भेटायला आलेले तेलंग दाम्पत्य पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी चोरट्याने सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण केले. तेलंग दाम्पत्याने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरू केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : राज्यात ‘या’ भागाला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बालकाचे अपहरण करणाऱ्या चोरट्यांना कर्नाटकातील विजापूर परिसरातून अटक केली. या टोळीने यापूर्वी असे अनेक गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरट्यांच्या तावडीतून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.