पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा परिसरात कारवाई करण्यात येत असल्याचा संदेश प्रसारित करून जातीय तणाव निर्माण केल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयान मेहबूब शेख, इब्राहिम आयाज शेख (दोघे रा. काळेपडळ, हडपसर), शाहरुक लईक शेख (रा. आझादनगर, वानवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात शेख यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा : रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईनंतर शरद पवार सरसावले, भाजपच्या सत्ताकाळातील ईडीच्या गैरवापराचा तपशील जाहीर
कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गाह परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याचा दिशाभूल करणारा संदेश शेख यांनी समाजमाध्यमात प्रसारित केला होता. या संदेशामुळे तणाव निर्माण झाला. शेख यांनी समाजमाध्यमातील खात्यातून संदेश प्रसारित केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे तपास करत आहेत.