Heavy Rain Alert Pune : मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने भिडे पूल, जयंतराव टिळक पूल, होळकर पुलासह शहरातील प्रमुख भुयारी मार्ग वाहतुकीस बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राेहिदास पवार यांनी दिले.

मुसळधार पावसामुळे शहरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर साचले होते. शिवाजीनगर भागातील संचेती चौकात असलेला भुयारी मार्गात माेठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने गुरुवारी सकाळी भुयारी मार्ग बंद करण्यात आला. महापालिकेचे मलनिस्सारण विभागातील कर्मचाऱ्यांनी तेथील पाण्याचा उपसा केला. दुपारनंतर संचेती चौकातील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करून देण्यात आला.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
carnac Bridge to be inaugurated in June Additional Commissioner inspects bridge work Mumbai news
कर्नाक पूल जूनमध्ये सुरु होणार; पुलाच्या कामाची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Mumbaikars await cold weather
थंडी पुन्हा कमी होण्याची शक्यता?
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Mumbai minimum temperature, Mumbai minimum temperature drops,
मुंबईच्या किमान तापमानात घट

हे ही वाचा… पुणे : उजेड असेपर्यंत जास्तीजास्त पाणी सोडा, पालकमंत्री अजित पवार यांचे आदेश

हे ही वाचा… खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला; ३५ हजार क्युसेकने मुठा नदीत पाणी

मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पाऊस झाला. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. भिडे पूल बुधवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद करण्यात आला. महापालिका भवन परिसरातील जयंतराव टिळक पूल गुरुवारी सकाळी वाहतुकीस बंद करण्यात आला. खडकीतील जुना होळकर पूल, मांजरीतील जुना पूल, मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरातील भुयारी मार्ग, चर्च रोड भुयारी मार्ग, बोपाेडीतील भुयारी मार्ग, तसेच शांतीननगर येथील पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. पाणी ओसरल्यानंतर शहरातील भुयारी मार्ग, पूल वाहतुकीस खुले करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पवार यांनी दिली.

Story img Loader